नवी दिल्ली : काळ्या पैशाविरुद्ध सरकारने उघडलेल्या मोहिमेला चांगलेच यश आले असून, मार्च २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या २० महिन्यांत १६ हजार कोटी रुपयांची अघोषित रक्कम उघड झाली आहे. या काळात १,२०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली.
महसूल सचिव हसमुख आधिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, २०१४-१५ ते २०१५-१६ (नोव्हेंबरपर्यंत) आयकर विभागाने आपल्या मोहिमेद्वारे हा काळा पैसा शोधून काढला. या साऱ्या प्रकरणात सप्टेंबर २०१५ पर्यंत ७७४ खटले दाखल करण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, अघोषित संपत्तीची घोषणा करण्यासाठी ९० दिवसांची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या काळात ४,१६० कोटी रुपयांच्या संपत्तीचा भंडाफोड झाला. आता चालू महिनाअखेरपर्यंत कर आणि दंड मिळून २,५०० कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे.
अधिया म्हणाले की, विद्यमान सरकार काळ्या पैशाच्या मुद्यावर गंभीर असून, काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात मुळीच कुचराई करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा शोधून काढण्यासाठी सरकारने ‘अघोषित विदेशी आय आणि संपत्ती आणि कराधान कायदा २०१५’ लागू केला आहे. या कायद्यानुसार कठोर दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. परदेशात अवैध मार्गाने काळा पैसा जमा करणाऱ्यांसाठी एकरकमी अनुपालन सुविधा प्रदान करण्यात आली होती. त्याद्वारे ते ६० टक्के कर आणि दंड भरून कायद्यातील तरतुदीतून स्वत:चा बचाव करू शकले असते. यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. या तीन महिन्यांत ६३५ प्रकरणांतून ४,१६० कोटी रुपयांच्या काळ्या पैशावर प्रकाश पडला. ते म्हणाले की, ज्यांनी परदेशातील काळ्या पैशाची माहिती उघड केली आहे.
> अन्य देशांतील सरकारांकडून निवासी करदात्यांबाबत माहिती प्राप्त करण्याच्या आमच्या प्रयत्नांना २०१६ मध्ये बळ मिळू शकते. यासंबंधात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणखी वेग घेऊ शकते. असाच करार अमेरिकेशी झाल्याने तेथून माहिती मिळण्यास प्रारंभ झाला आहे.
१६ हजार कोटींचा काळा पैसा उघड
काळ्या पैशाविरुद्ध सरकारने उघडलेल्या मोहिमेला चांगलेच यश आले असून, मार्च २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या २० महिन्यांत १६ हजार कोटी रुपयांची अघोषित रक्कम उघड झाली आहे
By admin | Updated: December 24, 2015 00:23 IST2015-12-24T00:23:24+5:302015-12-24T00:23:24+5:30
काळ्या पैशाविरुद्ध सरकारने उघडलेल्या मोहिमेला चांगलेच यश आले असून, मार्च २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या २० महिन्यांत १६ हजार कोटी रुपयांची अघोषित रक्कम उघड झाली आहे
