नवी दिल्ली : केंद्र सरकारने किरकोळ व्यापाराच्या ६ प्रस्तावांसह थेट परकीय गुंतवणुकीच्या एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी दिली. यामुळे १,५४६.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. औषधनिर्माण क्षेत्रात १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे विचारार्थ पाठविण्यात आला आहे.
परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या शिफारशींनंतर अर्थ मंत्रालयाने या २५ प्रस्तावांना मंजुरी दिली. ज्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे त्यात अमेरिकेची फ्लेमिंगो इंटरनॅशनल तथा मियामी परफ्यूम जंक्शन या मल्टी ब्रँडच्या किरकोळ व्यापाराचा प्रस्ताव समाविष्ट
आहे. यातून ५०.०५ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. औषधी क्षेत्रातील लॉरस लॅबच्या ६०० कोटी रुपयांच्या तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. औषधी क्षेत्रातील मॅडरिचचा प्रस्तावही विचारासाठी मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला आहे. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी) २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत ४८ प्रस्तावांवर विचार करील. या प्रस्तावांत किमान डझनभर प्रस्तावांचा समावेश
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१५४६ कोटी रुपयांचे एफडीआय प्रस्ताव मंजूर
केंद्र सरकारने किरकोळ व्यापाराच्या ६ प्रस्तावांसह थेट परकीय गुंतवणुकीच्या एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी दिली. यामुळे १,५४६.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
By admin | Updated: October 15, 2014 03:12 IST2014-10-15T03:12:11+5:302014-10-15T03:12:11+5:30
केंद्र सरकारने किरकोळ व्यापाराच्या ६ प्रस्तावांसह थेट परकीय गुंतवणुकीच्या एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी दिली. यामुळे १,५४६.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
