(फोटो)मौद्यातील िशवनगरात चोरी मौदा : शहरातील िशवनगरात चोरी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दािगने लंपास केले.िफयार्दी सुनीता िगरडकर (५२, रा. िशवनगर, मौदा) या नातेवाइकाच्या अंत्यिवधीसाठी नागपूर येथे गेल्या होत्या. िशवाय, त्यांच्याकडे िकरायाने राहणारे अिभयांित्रकी महािवद्यालयातील िवद्याथीर्ही बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. नेमकी ही संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या मुख्य दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी दािगन्यांसह १० हजार २०० रुपये रोख घेऊन घराच्या मागच्या दारातून पळ काढला. चोरट्यांनी जातेवेळी घराच्या मुख्य दाराची कडी आतून बंद केली होती. सुनीता िगरडकर या गुरुवारी सकाळी घरी आल्या तेव्हा त्यांना घराचे मुख्य दार आतून बंद असल्याचे तसेच मागचे दार उघडे असल्याचे िनदशर्नास आले. घरातील डबे व इतर सािहत्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे आढळून येताच त्यांनी मौदा पोिलसांना सूचना िदली. या प्रकरणी मौदा पेािलसांनी गुन्हा नोंदिवला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपिनरीक्षक नरेंद्र तायडे, हेडकॉन्स्टेबल मेटकर व सहकारी करीत आहे. (शहर प्रितिनधी)***
१५... मौदा... चोरी
(फोटो)
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:48+5:302015-01-15T22:32:48+5:30
(फोटो)
