Lokmat Money > बिझनेस न्यूज > फ्लिपकार्ट भरती करणार १२ हजार कर्मचारी

फ्लिपकार्ट भरती करणार १२ हजार कर्मचारी

आॅनलाईन व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची कंपनी यंदा १२ हजार नवे कर्मचारी भरती करणार आहे.

By admin | Updated: June 23, 2014 18:01 IST2014-06-23T05:16:20+5:302014-06-23T18:01:00+5:30

आॅनलाईन व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची कंपनी यंदा १२ हजार नवे कर्मचारी भरती करणार आहे.

12 thousand employees to fill in Flipkart | फ्लिपकार्ट भरती करणार १२ हजार कर्मचारी

फ्लिपकार्ट भरती करणार १२ हजार कर्मचारी

नवी दिल्ली : आॅनलाईन व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची कंपनी यंदा १२ हजार नवे कर्मचारी भरती करणार आहे.
भारतातील आॅनलाईन व्यवसायाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे आॅनलाईन व्यवसाय वाढीला भारतात मोठा वाव आहे. या क्षेत्रात फ्लिपकार्टने आधीच आपले बस्तान बसविले आहे. यंदा कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीने देशभरात आपले जाळे पसरविण्यासाठी मोठी विस्तार योजना हाती घेतली आहे. त्यासाठी कंपनीला मोठा कर्मचारी वर्ग लागणार आहे. कंपनीचे मुख्यालय बंगळुरूत आहे. फ्लिपकार्टचे सीपीओ मेकीन माहेश्वरी यांनी सांगितले की, व्यवसाय वाढल्यामुळे आम्ही विस्तार योजना हाती घेतली आहे. सध्याची आमची कर्मचारी संख्या १३ हजार आहे. ती वाढवून २५ हजार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: 12 thousand employees to fill in Flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.