Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका

सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे तोटा वाढत चालला आहे. तिमाही आकडेवारीनुसार या बँकांचा तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:38 IST2016-02-15T03:38:26+5:302016-02-15T03:38:26+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे तोटा वाढत चालला आहे. तिमाही आकडेवारीनुसार या बँकांचा तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला आहे

12 thousand crores of rupees fall in public sector banks | सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका

सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे (अनुत्पादित संपत्ती) तोटा वाढत चालला आहे. तिमाही आकडेवारीनुसार या बँकांचा तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला आहे. यात बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया आणि आयडीबीआय यासारख्या बँकांचा समावेश आहे, तर एसबीआय, पीएनबी आणि कॅनरा बँकेच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
बँक आॅफ बडोदाला ३,३४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एखाद्या बँकेचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे तिमाही नुकसान आहे. आयडीबीआय बँकेला २,१८४ कोटी रुपयांचा, तर बँक आॅफ इंडियाला १,५०५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याशिवाय युको बँकेला १,४९७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे

Web Title: 12 thousand crores of rupees fall in public sector banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.