ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - भारतात ऑनलाइन खरेदीचे महत्व वाढले असून २०१६ पर्यंत भारतात जवळपास १० कोटी ऑनलाइन शॉपर्स (खरेदीदार )होतील असा अंदाज गुगलने वर्तविला आहे. गुगलने गुरूवारी आपला वार्षिक ऑनलाइन अहवाल प्रसिध्द केला असून यामध्ये हा अंदाज वर्तविला आहे.
गुगलच्या अहवालानूसार, भारतात २०१२ मध्ये ऑनलाइन खरेदी करणा-या लोकांची संख्या ८० लाख होती तर यावर्षीपर्यंत ही संख्या साडे तीन कोटीपर्यंत पोहोचली असल्याचे गुगलने म्हंटले आहे. भारतात यावर्षीपर्यंत ३० कोटीपर्यंत इंटरनेट युझर्सची संख्या जाणे अपेक्षित असून ही संख्या वेब इकॉनॉमीमधील सर्वाधिक दुस-या क्रमांकाची ठरणार आहे, अशी माहिती भारतीय गुगलचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी दिली आहे. भारतात मोबाईलद्वारे इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढताना दिसत असून ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून अनेक उत्पादक खरेदी करतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून कॉस्मेटीक वस्तूंचा समावेश असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलच्या सर्वेनूसार देशातील वेगवेगळया ५० शहरातील ६ हजार ८५९ जणांच्या केलेल्या सर्वेनूसार २०१६ पर्यंत भारतात १० कोटी ऑनलाइन शॉपर्स तयार होणार असल्याचे गुगलने आपल्या अहवालामध्ये म्हंटले आहे. आगामी दोन वर्षामध्ये ऑनलाइन खरेदीदारांची संख्या १० कोटी होईल व त्यामध्ये जवळपास ४ कोटी महिलांची संख्या असेल असा निष्कर्ष गुगलने आपल्या अहवालात काढला आहे.
भारतात २०१६ पर्यंत १० कोटी ऑनलाइन शॉपर्स - गुगलचा अहवाल
भारतात ऑनलाइन खरेदीचे महत्व वाढले असून २०१६ पर्यंत भारतात जवळपास १० कोटी ऑनलाइन शॉपर्स (खरेदीदार )होतील असा अंदाज गुगलने वर्तविला आहे
By admin | Updated: November 21, 2014 03:29 IST2014-11-21T03:28:41+5:302014-11-21T03:29:23+5:30
भारतात ऑनलाइन खरेदीचे महत्व वाढले असून २०१६ पर्यंत भारतात जवळपास १० कोटी ऑनलाइन शॉपर्स (खरेदीदार )होतील असा अंदाज गुगलने वर्तविला आहे
