प्रदीप भाकरे, अमरावती
अधिक व्याजदर आणि गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या अमरावतीकरांना तब्बल १०० कोटी रुपयांनी गंडविण्यात आले आहे. मागील २ वर्षांत ७ ‘फ्रॉड’ कंपन्यांविरुद्ध १५५० पेक्षा अधिक तक्रारी होऊनही गुंतवणूकदारांचे डोळे उघडलेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ‘लाईफलाईन ओरिएंटल’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणाने ‘प्रलोभनाचे बळी कुठवर’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आॅक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट, राणा लँडमार्क प्रा. लिमिटेड, बीएचआर मल्टिस्टेट, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट, सात्विक इन्व्हेस्टमेंट,
चित्रांश टेक्नॉलॉजी आणि लाईफलाईन ओरिएंटल ट्रेडलिंक्स लिमिटेड या खासगी वित्तीय संस्थांनी अमरावती जिल्ह्यातील ग्राहकांना सुमारे ७७ कोटींनी लुबाडल्याची पोलीस दफ्तरी अधिकृत नोंद
आहे. तथापि पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा नको म्हणून तक्रारीसाठी समोर न आलेल्या ग्राहकांची फसवणूक पाहता हा आकडा १०० कोटींपर्यंत जातो.
प्रशासकाची नियुक्ती
भाईचंद हिराचंद रायसोनी ‘बीएचआर’ मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला. नागपूरच्या ‘श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट’ या ठकबाज कंपनीच्या फसवणूकप्रकरणी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तर राणा लँडमार्कवरसुद्धा प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आल्याने या तीन वित्तीय संस्थांमध्ये गुंतवलेली रक्कम कधीतरी परत मिळेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत इतर कुठलीही खासगी वित्तीय संस्था अधिक व्याजदर देण्याचे आमिष दाखवीत असेल तर ती कंपनी फ्रॉड समजावी. चेन मार्केटिंग हासुद्धा कायदेशीर गुन्हा आहे.
-सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त, अमरावती.
‘फ्रॉड’ कंपन्यांकडून १०० कोटींनी फसवणूक
अधिक व्याजदर आणि गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या अमरावतीकरांना तब्बल १०० कोटी रुपयांनी गंडविण्यात आले आहे.
By admin | Updated: December 20, 2015 22:41 IST2015-12-20T22:41:37+5:302015-12-20T22:41:37+5:30
अधिक व्याजदर आणि गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या अमरावतीकरांना तब्बल १०० कोटी रुपयांनी गंडविण्यात आले आहे.
