Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदींचा 'मित्रों' मिळवून देणार 100 टक्के कॅशबॅक

मोदींचा 'मित्रों' मिळवून देणार 100 टक्के कॅशबॅक

प्रसिद्ध डिजिटल वॉलेट मोबिक्विकनं एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून यामध्ये ‘Mitron’ कोडचा वापर करताच 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे

By admin | Updated: January 3, 2017 09:06 IST2017-01-03T08:56:48+5:302017-01-03T09:06:27+5:30

प्रसिद्ध डिजिटल वॉलेट मोबिक्विकनं एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून यामध्ये ‘Mitron’ कोडचा वापर करताच 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे

100% cashback for Modi's friends | मोदींचा 'मित्रों' मिळवून देणार 100 टक्के कॅशबॅक

मोदींचा 'मित्रों' मिळवून देणार 100 टक्के कॅशबॅक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून नवनवीन ऑफर्सची घोषणा होत असते. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मित्रों' शब्द फारच ट्रेंडमध्ये असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध डिजिटल वॉलेट मोबिक्विकनं ग्राहकांसाठी अशीच एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून यामध्ये ‘Mitron’ कोडचा वापर करताच 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. नुकताच मोबिक्विकने 'मित्रों' या हाकेचा प्रोमोकोड जाहीर केला आहे. पण या ऑफरमध्ये एक अट असून ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात  'मित्रों' शब्द वापरतील त्याचदिवशी हा कोड वापरता येणार आहे. 
 
(आश्चर्य ! मोदींनी एकदाही म्हटलं नाही 'मित्रोंss')
(मोदींनी 'मित्रो' म्हटलं तर 31 रुपयांत मिळणार बिअर)
(मोदींच्या 'मित्रो'चा सोशल मीडियाने घेतला धसका)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पुर्वसंधेला देशाला संबोधित करत केलेल्या भाषणात एकदाही मित्रोंचा उच्चार केला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर यावरुन आश्चर्य व्यक्त होऊ लागलं. इतकंच काय एका बारने तर मोदी जितक्या वेळा मित्रों म्हणतील तितक्या वेळा फक्त 31 रुपयांच बिअर देण्याची घोषणाच करुन टाकली होती. पण कोणालाही या ऑफरचा फायदा झाला नाही ही गोष्ट वेगळी. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारावर भर देण्याचं आवाहन केल्यापासून डिजिटल वॉलेटच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. याचाच फायदा मोबिक्विकने घेण्याचा ठरवत ही ऑफर जाहीर केली आहे. मोबिक्विकवरुन कोणताही व्यवहार केल्यास त्यावर 100 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. या ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त 100 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. कमीत कमी 10 रुपयांच्या रिचार्जसाठी हा कोड वापरता येईल. मोबिक्विकची ही ऑफर 31 जानेवारी 2017 पर्यंत वैध असेल. तसंच एका नंबरवरुन हा कोड एकदाच वापरता येईल.
 

Web Title: 100% cashback for Modi's friends