Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘चिल्ड्रन बँके’चे दहा लाख जप्त

‘चिल्ड्रन बँके’चे दहा लाख जप्त

येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेत ९ लाख ९0 हजार रुपये किमतीच्या बनावट खोट्या नोटा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

By admin | Updated: March 14, 2017 23:57 IST2017-03-14T23:57:54+5:302017-03-14T23:57:54+5:30

येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेत ९ लाख ९0 हजार रुपये किमतीच्या बनावट खोट्या नोटा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

10 lakhs of children's bank seized | ‘चिल्ड्रन बँके’चे दहा लाख जप्त

‘चिल्ड्रन बँके’चे दहा लाख जप्त

हैदराबाद : येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेत ९ लाख ९0 हजार रुपये किमतीच्या बनावट खोट्या नोटा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’ऐवजी ‘चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया’ अशी अक्षरे असलेल्या नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच होत्या.
या प्रकरणात हैदराबादेतील कुशियागुडा पोलिसांनी युसूफ शेख याला अटक केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही एटीएममधून चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया अशी अक्षरे छापलेल्या नोटा काही नागरिकांना अलीकडेच मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेख याची अटक महत्त्वाची समजली जात आहे.
पोलिसाच्या माहितीनुसार, हैदराबादेतील राधिका थिएटरजवळील एएस रावनगर येथील बँकेत हा प्रकार घडला. आरोपी युसूफ शेखने २ हजारांच्या ४00 नोटा आणि पाचशेच्या ३८0 नोटा असलेली बंडले कॅशिअरकडे भरणा करण्यास दिली. या नोटा कॅशिअरने स्वीकारल्या. या नोटा खऱ्या नोटांसारख्याच असल्यामुळे कॅशिअरला सुरुवातीला कोणताही संशय आला नाही. मात्र नोटा मोजत असताना त्याने थोडे काळजीपूर्वक पाहिले असता त्याला धक्काच बसला. नोटांवर चक्क ‘चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया’ अशी अक्षरे छापलेली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: 10 lakhs of children's bank seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.