टोल प्लाझाबाबत गडकरींशी बोलणार -राजनाथसिंग
लखनौ : अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने आपल्या मागण्यांसाठी १ आॅक्टोबर रोजी देशव्यापी वाहतूक बंदचे आयोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर; आपण टोल प्लाझाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लखनौ येथे रविवारी दिली.
टोल बॅरिअर्समुळे जनतेची अडचण होत आहे आणि चर्चेतून त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे राजनाथसिंग म्हणाले. ते अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलत होते. यावेळी वाहतूक विकास ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश गुप्ता यांनी राजनाथसिंग यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. वाहतूकदार आणि देशाच्या जनतेला टोल प्लाझापासून मुक्ती हवी, आहे असे गुप्ता यांनी यावेळी गृहमंत्र्यांना सांगितले. (वृत्तसंस्था)
१ आॅक्टोबरला वाहतूकदारांचा बंद
अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने आपल्या मागण्यांसाठी १ आॅक्टोबर रोजी देशव्यापी वाहतूक बंदचे आयोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर
By admin | Updated: September 28, 2015 01:52 IST2015-09-28T01:52:45+5:302015-09-28T01:52:45+5:30
अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने आपल्या मागण्यांसाठी १ आॅक्टोबर रोजी देशव्यापी वाहतूक बंदचे आयोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर
