Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ लाख कोटी उघडकीस !

१ लाख कोटी उघडकीस !

गेल्या मार्चमध्ये संपलेल्या वित्तीय वर्षात प्राप्तिकर विभागाने केलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक दडवलेले उत्पन्न उघड झाले

By admin | Updated: July 17, 2014 00:07 IST2014-07-16T23:42:21+5:302014-07-17T00:07:48+5:30

गेल्या मार्चमध्ये संपलेल्या वित्तीय वर्षात प्राप्तिकर विभागाने केलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक दडवलेले उत्पन्न उघड झाले

1 million crore exposed! | १ लाख कोटी उघडकीस !

१ लाख कोटी उघडकीस !

नवी दिल्ली : गेल्या मार्चमध्ये संपलेल्या वित्तीय वर्षात प्राप्तिकर विभागाने केलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक दडवलेले उत्पन्न उघड झाले. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कारवाईत वर्र्ष २०१२-१३ मध्ये करदात्यांनी उघड न केलेले जेवढे उत्पन्न उघड झाले होते त्याहून दुप्पट दडवलेले उत्पन्न गेल्या वर्षी उघड झाले आहे.
करबुडवेगिरी रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग व्यक्ती, व्यापारी संस्था, कंपन्या व अन्य वित्तीय संस्थांविरुद्ध अशी कारवाई नियमितपणे करीत असते. जेव्हा प्राप्तिकर विभागाचे अधिकारी संबंधित करदात्याचे व्यवसायाचे ठिकाण व निवासस्थान अशा दोन्ही ठिकाणी धाडी घालते त्याला शोध कारवाई (सर्च आॅपरेशन) म्हटले जाते. जेव्हा फक्त व्यवसायाच्या ठिकाणी धाड टाकली जाते त्या कारवाईस जप्ती कारवाई (सिझर आॅपरेशन) म्हटले जाते.
प्राप्तिकर विभागाने उपलब्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार अलीकडेच संपलेल्या २०१३-१४ या वित्तीय वर्षात शोध कारवायांमध्ये १०,७९१.६३ कोटी रुपयांचे उघड न केलेले उत्पन्न उघड झाले. तसेच याच काळात देशभरात केलेल्या जप्ती कारवायांमध्ये करदात्यांनी दडविलेले ९०,३९०.७१ कोटी रुपयांचे उत्पन्न बाहेर आले.
अशा प्रकारे या दोन्ही प्रकारच्या कारवायांमध्ये वर्षभरात उघड झालेल्या लपविलेल्या उत्पन्नाचा आकडा १,०१,१८१ कोटी रुपये एवढा होता.
या तुलनेत २०१२-१३ या वित्तीय वर्षात अशाच प्रकारे केल्या गेलेल्या दोन्ही प्रकारच्या कारवायांमध्ये याहून निम्म्याहूनही कमी म्हणजे २९,६२८ कोटी रुपयांचे दडवलेले उत्पन्न उघड केले गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 1 million crore exposed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.