Mutual Fund Loan: म्युच्युअल फंडांकडून कर्ज घेणं हे सहसा जोखमीचं पाऊल असू शकतं. म्युच्युअल फंडाकडून कर्ज घेणं म्हणजे आपण आपल्या म्युच्युअल फंडातील युनिट्स गहाण ठेवून कर्ज घेता.
फायदे काय?
कमी व्याजदर : म्युच्युअल फंडातील कर्जाचा व्याजदर सामान्यत: पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डपेक्षा कमी असतो.
प्रोसेसिंग : म्युच्युअल फंडाकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया जलद असते आणि त्यासाठी फारच कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.
कर्जासाठी इतर कोणतीही मालमत्ता आवश्यक नाही. या कर्जात केवळ आपल्या म्युच्युअल फंडाचे युनिट गहाण ठेवले जातात, त्यामुळे इतर कोणत्याही मालमत्तेची आवश्यकता नसते.
नुकसान काय?
गुंतवणुकीवर परिणाम : म्युच्युअल फंडाचे युनिट्स घसरले तर नुकसान होऊ शकते. कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला ते विकण्याची आवश्यकता पडू शकते, ज्याचा परिणाम आपल्या गुंतवणुकीवर होऊ शकतो.
व्याजाची परतफेड : कर्जाचे हप्ते वेळेत फेडू न शकल्यास व्याज वाढू शकतं, ज्यामुळे एकूण परतफेडीची रक्कम वाढेल.
जोखीम : म्युच्युअल फंडाचे युनिट्स कमी झाल्यास तुम्हाला एकतर कर्जाच्या रकमेसाठी जास्त पैसे मोजावे लागतील किंवा तुमचे युनिट्स विकावे लागतील.
जर तुम्ही म्युच्युअल फंडातून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम आहात याची खात्री करून घ्यावी आणि तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं. जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि तुम्ही जोखीम घेण्यास तयार आहात तोपर्यंत हा पर्याय परिपूर्ण ठरू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)