Hinduja Industries Group acquires Jet Airways | हिंदुजा उद्योग समूह करणार जेट एअरवेजचे अधिग्रहण

हिंदुजा उद्योग समूह करणार जेट एअरवेजचे अधिग्रहण

मुंबई : जेट एअरवेजची खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या हिंदुजा उद्योग समूहास जेटमधील प्रमुख भागीदार नरेश गोयल आणि एतिहाद एअरवेज यांचा पाठिंबा मिळाला आहे. हिंदुजा समूह याच आठवड्यात जेटसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याचे समजते.


नरेश गोयल हे जेटचे संस्थापक असून, एतिहादप्रमुख हिस्सेदार आहेत. या दोघांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे हिंदुजा समूहाचा मार्ग मोकळा झाला आहे. एसबीआय कॅपिटल मार्केटच्या नेतृत्वाखालील गुंतवणूक बँक समूहाशीही हिंदुजांचे बोलणे सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, नरेश गोयल आणि हिंदुजा यांचे सुमारे दोन दशकांपासून चांगले संबंध आहेत. जेटवर थकलेल्या १२ हजार कोटींच्या कर्जात बँकांनी मोठी सवलत द्यावी, अशी हिंदुजा समूहाची अपेक्षा आहे.


जेट खरेदी करण्यात टाटा उद्योग समूहाने सुरुवातीला रस दाखविला होता. तथापि, नंतर त्यांनी माघार घेतली. हिंदुजा समूहाने याआधी सरकारी मालकीच्या एअर इंडियात रस दाखविला होता. १९९७ ते २००० या काळात हिंदुजांनी भारत आणि शारजा यांच्यामधील हवाई मालवाहतुकीसाठी लुफ्तसाना एअरकार्गोशी भागीदारी केली होती.


बहुलांश भागीदारी खरेदी करून जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्याचा हिंदुजा समूहाचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दिवसेंदिवस जेट एअरवेजचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. कंपनीचे काम पूर्णत: थांबले आहेच. शिवाय पायलटही स्पर्धक कंपन्यांच्या सेवेत रुजू होत आहेत. अधिग्रहणास जितका उशीर होईल, तितके संकट वाढत जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.जेटच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने
नवी दिल्ली : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी नागरी उड्डयन मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. कंपनीचे पुनरुज्जीवन करावे, तसेच आपले थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.
या निदर्शनांत जेटचे २०० कर्मचारी सहभागी झाले. ‘आमचा आक्रोश ऐका, ९डब्ल्यूला उडू द्या’ असे फलक कर्मचाºयांच्या हातात होते. ९डब्ल्यू हा जेट एअरवेजचा फ्लाईट कोड आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hinduja Industries Group acquires Jet Airways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.