Lokmat Money > बिझनेस न्यूज > वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरकारला

वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरकारला

आपल्या स्विस खात्यातील अनेकांनी रकमांवर दावाच करण्याचे टाळल्याने तो सारा पैसा आता स्वित्झर्लंड सरकारच्या ताब्यात जाणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:27 AM2019-11-12T04:27:34+5:302019-11-12T04:27:40+5:30

आपल्या स्विस खात्यातील अनेकांनी रकमांवर दावाच करण्याचे टाळल्याने तो सारा पैसा आता स्वित्झर्लंड सरकारच्या ताब्यात जाणार आहे.

 The government will get the funds from unused Swiss accounts | वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरकारला

वापरात नसलेल्या स्विस खात्यांतील रकमा मिळणार तेथील सरकारला

नवी दिल्ली : आपल्या स्विस खात्यातील अनेकांनी रकमांवर दावाच करण्याचे टाळल्याने तो सारा पैसा आता स्वित्झर्लंड सरकारच्या ताब्यात जाणार आहे. स्विस सरकारने वापरात नसलेल्या भारतीयांच्या खात्यांची यादी २0१५ साली जाहीर केली होती. या २,६00 खात्यांतील पैशावर कोणीही दावा केलेला नाही.
भारतीयांची अनेक खाती अनेक वर्षांपासून वापरात नाहीत. त्यामुळेच त्या खात्यांमधील पैसा त्या देशातील कायद्याप्रमाणे स्वित्झर्लंड सरकारकडे हस्तांतरित केला जाईल. यांमध्ये भारतीयांची किमान १0 खाती असल्याचे सांगण्यात येते. त्या खात्यांतील रकमांवर भारतीयांनी दावा केला नसल्याचे सांगण्यात आले. डिसेंबरपर्यंत कोणी त्यावर दावा सांगते का, हे पाहिले जाईल. अन्यथा त्यांतील रक्कम स्वित्झर्लंड सरकारला मिळेल.
याखेरीज पाकिस्तानमधील काही जणांची खातीही तिथे आहेत. मात्र, स्विस बँकांनी सूचना दिल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी त्यावर आपला दावा केला, शिवाय अन्य अनेक देशांतील मंडळींची खातीही तिथे आहेत.

Web Title:  The government will get the funds from unused Swiss accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.