BSNL will pay only 6 paise per customer; Reply to Geo | बीएसएनएल ग्राहकांनाच देणार प्रत्येक कॉलसाठी सहा पैसे; जिओला प्रत्युत्तर

बीएसएनएल ग्राहकांनाच देणार प्रत्येक कॉलसाठी सहा पैसे; जिओला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : जिओच्या नेटवर्कवरून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल केल्यास ग्राहकाकडून सहा पैसे शुल्क आकारण्याच्या जिओला सरकारच्या बीएसएनएलने सडेतोड उत्तर दिले आहे. बीएसएनएलने जिओच्या निर्णयाविरोधात एक योजना जाहीर केली आहे. त्यानुसार तुम्ही व्हॉइस केल्यास बीएसएनएल कंपनीच तुम्हाला पैसे देणार आहे.

आपल्या वायरलाइन, ब्रॉडबँड व एफटीटीएच सेवांद्वारे व्हॉइस कॉल केल्यास ग्राहकांना कॅशबॅक देण्याची योजना बीएसएनएलने जाहीर केली आहे. या सेवांच्या आधारे कोणत्याही नेटवर्कवर पाच मिनिटे वा त्याहून अधिक अवधीचा कॉल केल्यास प्रति कॉल सहा पैसे या दराने बीएसएनएल कॅशबॅक देईल. अन्य कंपन्यांकडे गेलेले ग्राहक यामुळे आपल्याकडे वळतील, असा बीएसएनएलचा कयास आहे.
बीएसएनल बंद पडणार, कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती दिली जाणार, अशा बातम्या येत असतानाच कंपनीने ही आनंदाची बातमी दिली. मध्यंतरी केंद्राने बीएसएनएल व एमटीएनएल यांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे पुढे-मागे ही योजना एमटीएनएलच्या मुंबई-दिल्लीच्या ग्राहकांनाही लागू होऊ शकते.

ग्रामीण भागांत होणार फायदा
जिओच्या योजनेमुळे नाराज झालेले ग्राहक आपल्याकडे आणण्यासाठी बीएसएनएलने ही योजना आणल्याचे बोलले जात आहे. सध्या देशाच्या ग्रामीण भागांत बीएसएनएल कंपनीचेच अधिक ग्राहक आहेत. त्यांना या घोषणेचा निश्चितच फायदा होईल.

३० सेकंद वाजणार रिंग
मोबाइल सेवा देणाºया कंपन्यांमध्ये वाद सुरु असतानाच ट्रायने १ नोव्हेंबरपासून कॉल रिंग किती काळ वाजेल हे निश्चित केले. मोबाइलवरून मोबाइलवर कॉलची रिंग ३० सेकंद वाजेल. मोबाइवरून लँडलाइनवर कॉलची रिंग ६० सेकंद वाजणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BSNL will pay only 6 paise per customer; Reply to Geo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.