देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. या महिन्याच्या १६ तारखेला ना तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल ना यूपीआयच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार करू शकाल. इतकंच नाही तर १६ जुलै रोजी तुम्ही आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएसमधून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. होय, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं सोमवारी, १४ जुलै रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही सर्व माहिती शेअर केली.
स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की, बँकेच्या UPI, ATM, YONO, IMPS, RINB (रिटेल इंटरनेट बँकिंग), NEFT आणि RTGS सेवा बुधवार, १६ जुलै रोजी रात्री ०१.०५ ते ०२.१० पर्यंत एकूण १ तास ५ मिनिटांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
Due to scheduled maintenance activity, our services UPI, IMPS, YONO, RINB, ATM, NEFT and RTGS will be temporarily unavailable from 01:05 hrs to 02:10 hrs on 16.07.2025 (IST). These services will resume by 02:10 hrs on 16.07.2025 (IST).
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 14, 2025
Meanwhile, customers are advised to use our…
या सर्व सेवा रात्री ०२.१० नंतर पुन्हा सुरू होतील आणि पूर्वीप्रमाणेच सामान्यपणे काम करतील, असंही बँकेनं म्हटलंय. स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार १६ जुलै रोजी दुपारी ०१.०५ ते ०२.१० पर्यंत देखभालीचं काम करायचे आहे, त्यामुळे या सर्व सेवा बंद राहणार आहेत.
युपीआय लाईटचा वापर करता येणार
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं सांगितलं की हे देखभालीचं काम आधीच नियोजित करण्यात आलं होतं. बँकेनं म्हटलंय आहे की सेवा बंद असताना, UPI ऐवजी UPI Lite सेवा वापरता येईल. यासोबतच, बँकेनं या गैरसोयीबद्दल आपल्या दिलगिरी व्यक्त केलीये. आता सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सेवा प्रदान करतात आणि त्यांना वेळोवेळी त्यांची ऑनलाइन बँकिंग प्रणालीचा मेंटेनन्स आणि अपडेशन करावं लागतं ज्यामुळे बँकिंग सेवा काही काळासाठी बंद राहतात.