Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफच्या उपचाराचा खर्च किती? जाणून तुम्हीही डोक्याला हात लावाल! 'या' दिवशी मिळू शकतो डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:41 IST

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवार, १६ जानेवारी रोजी मध्यरात्री एका चोरट्याने त्याच्या ...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवार, १६ जानेवारी रोजी मध्यरात्री एका चोरट्याने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूहल्ला केला, यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो गेल्यापासूनच डॉक्टरांच्या निगराणीत होता. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देताना, तो हळूहळू बरा होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आता तो हळूहळू चालण्याचाही प्रयत्न करत आहे. दरम्यान, त्यांच्या उपचारांच्या खर्चासंदर्भातही माहिती समोर येत आहे. जी पाहून सर्वच जण अवाक झाले आहेत. अगदी तुम्हीही डोक्याला हात लावाल. खरेतर, सैफ अली खानच्या विम्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानुसार, त्याच्या कॅशलेस उपचारांना १६ जानेवारी २०२५ रोजी मंजूर करण्यात आला. त्याला आणखी ५ दिवस रुग्णालयात रहावे लागणार आहे. याचाच अर्थ त्याला 21 जानेवारी, 2025 पर्यंत सुट्टी मिळू शकते. 

उपचारावर किती खर्च -सैफच्या उपचाराचा एकूण खर्च ३५९८७०० रुपये एवढा आहे. यांपैकी २५ लाख रुपये विम्याच्या माध्यमाने मंजूर झाले आहेत. गुरुवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर त्याच्या घरात चाकूहल्ला झाला. त्याच्यावर 6 वार करण्यात आले होते. त्याच्या मानेवर आणि खांद्यावर जखमा झाल्या होत्या. यानंतर त्याला रुग्णालयात लिलावतीत दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर ५ तास शस्त्रक्रिया चालली आणि त्याच्या पाठीतून २.५ इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला.

आता कशी आहे प्रकृती? -डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसरा, आता सैफची प्रकृती बरी आहे, स्थिर आहे. तो कुठलेही वेदनेशिवाय चालू शकत आहे. त्याला आयसीयूमधून बाहेर हलवण्यात आले आहे.

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडहॉस्पिटलडॉक्टर