यंदा राज्यात तब्बल १२ दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र मराठवाड्यात मान्सूनचे चित्र हे जूनच्या प्रारंभीच स्पष्ट होईल असे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले आहे.
श्रीनिवास औंधकर म्हणाले, सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळेपाऊस पडत आहे. आताचा हा पाऊस २७ तारखेपर्यंत पडेल. त्यानंतर पाऊस काहीसा थांबेल. सहसा दरवर्षी तळकोकणात ७ जूनला मान्सून दाखल होत असतो. तर १० जूनला मान्सून मराठवाड्यात दाखल होत असतो. यंदा जूनच्या प्रारंभी मराठवाड्यातील मान्सूनची स्थिती स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ज्यात पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील आहे. पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून, तापमानात घट झाली आहे.
मराठवाड्याच्या कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पाऊस ? (जिल्हा - पाऊस मिमी)
छत्रपती संभाजीनगर - १२२.३
जालना - १३७.९
बीड - १३९.९
लातूर - १९३.४
धाराशिव - १६७.५
नांदेड - १०४.९
परभणी - २३.८
हिंगोली - १०२.८
श्रीनिवास औंधकर
हवामानतज्ज्ञ