lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण'

Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण'

Weather Updates next ten days hailstorme and hravy rain inn maharashtra weather updates | Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण'

Weather Updates : 'पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण'

येणाऱ्या दहा दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 

येणाऱ्या दहा दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Rain And Weather Updates :  राज्यातील विविध ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस सुरू असून येणाऱ्या दहा दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 

अवकाळीचे वातावरण-  मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (१६ - २५ एप्रिल ) दहा दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र आजपासून केवळ (१६, १७, १८ एप्रिल ) तीन दिवस अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. 

उष्णतेची लाट- मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर ठाणे जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.

रात्रीचा उकाडा- मध्य महाराष्ट्रातील  खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा १० जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो. 

किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता - मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजरात राज्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल. 

- माणिकराव खुळे  Meteorologist (Retd) IMD Pune
 

Web Title: Weather Updates next ten days hailstorme and hravy rain inn maharashtra weather updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.