Pune : नवीन वर्षाला सुरूवात झाली असून सध्या राज्यात असलेली थंडी अजून कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच मागील वर्षात म्हणजे २०२५ या वर्षात हवामान, पाऊस आणि तापमानान महत्त्वाचे बदल घडले. हवामानाच्या इतिहासात खूप कमी वेळा घडणारी घटना मागच्या वर्षी घडली आणि खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाने भारताही तहान भागवली. पण २०२५ या वर्षातील हवामान नेमकं कसं होतं?
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला.
कसं होतं २०२५ हे वर्ष?
- जानेवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं.
- मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कमीजास्त तापमान पाहायला मिळाले.
- उष्णतेच्या लहरीसुद्धा याच महिन्यात पाहायला मिळाल्या.
- मे महिन्यातच मान्सूनचे आगमन
- केरळमध्ये लवकर दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात २५ मे रोजी दाखल
- मे महिन्यानंतर काही दिवस पावसाची विश्रांती, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात
- जूनमध्ये पावसाला पुन्हा सुरूवात
- जुलै - ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासहित भारतात चांगला पाऊस
- मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पूर परिस्थिती
- चक्रीवादळाचा खूप जास्त परिणाम झालेला दिसून आला नाही.
- सप्टेंबर महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी
- यंदाचा ईशान्य मोसमी पाऊस कमी प्रमाणात पडणार
- 'ला-निना'चा ईशान्य मोसमी पावसावर परिणाम
- डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान
नवीन वर्षातील पहिले तीन महिने
नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यासोबतच जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने वातावरण कोरडे राहणार आहे. जानेवारी फेब्रुवारी व मार्च महिन्यात पावसाची शक्यता कमी असून तापमान हे सरासरी इतकं किंवा सरासरीपेक्षा थोडसं कमी असण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
