Join us
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:52 IST

सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

खरिपाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा आता रब्बी हंगामावर आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र करपरा कालव्यामुळे सिंचनाखाली येत असल्याने तसेच सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार आहे.रब्बी हंगामासाठी करपरा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी वर्णा गावचे सरपंच नंदकुमार आंबोरे यांनी पाटबंधारे विभागाची अधीक्षक अभियंता यांना भेटून पाणी सोडण्याबाबत मागणी केली.

या मागणीची दखल घेत दोन-तीन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागांनी सरपंचांना लेखी देण्यात आली. तसेच सध्या करपरा कालव्याच्या दुरुस्तीची काम सुरू असून, दोन ते चार दिवसांत शेतकऱ्यांना पाणी मिळेल शेतकऱ्यांना पाणी लवकर मिळेल सुरळीत पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी कर तत्काळ पाटबंधारे विभागाकडे भरणे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

English
हिंदी सारांश
Web Title : Water released from Karpara canal for Rabi irrigation: Relief to farmers

Web Summary : Following Kharif losses, Rabi crops get hope. Water will be released from the Karpara canal in 3-4 days for Rabi irrigation in Parbhani district, benefiting thousands of hectares. Canal repairs are underway, and farmers are urged to pay water taxes promptly.
टॅग्स :पाणीनदीधरणरब्बी हंगामशेतीशेतकरीपीकशेती क्षेत्रमराठवाडा