Join us

विदर्भाच्या विविध १८ प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरूच! २८९ सिंचन प्रकल्प अध्यापही तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:01 IST

Vidarbha Water Update : यंदा पश्चिम विदर्भात समाधानकारक व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागातील २८९ मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. 

यंदा पश्चिम विदर्भात समाधानकारक व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागातील २८९ मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. 

सोमवार २० ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालानुसार, एकूण जलसाठा ९४.४९ टक्के इतका झाला असून, २० मोठ्या व मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील १८ प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

१८ मध्यम प्रकल्पामध्ये अकोला जिल्ह्यातील निगुर्णा मध्यम प्रकल्पात १०० टक्के साठा असून, पूर उंची १ से.मी. विसर्ग ०.९०६ क्यूमेक होता. मोर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून, पूर उंची २ से.मी. विसर्ग ०.६८ क्यूमेक सुरू आहे. उमा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून पूर उंची ५ से मी विसर्ग ५.६० क्युमेक होता.

घुंगशी प्रकल्पाचे १ एक गेट १० से.मी. विसर्ग ९.३९ क्यूमेक होता. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून, २ गेट २ से.मी. विसर्ग ४.८७ क्यूमेक असून, सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. 

हेही वाचा : कोकणातील नारळाची शेती रमेशरावांच्या यशस्वी प्रयोगातून वाशिमच्या शेलू खडसे शेतशिवारात बहरली

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Dams Overflowing: Water Discharged from 18 Projects Continues

Web Summary : Heavy rains filled 289 Vidarbha irrigation projects to capacity. Eighteen projects in Akola district are discharging water. Water release continues from 20 major and medium projects, with overall water storage at 94.49% as of October 20th.
टॅग्स :पाणीनदीअकोलाविदर्भशेती क्षेत्रपाऊसधरण