Lokmat Agro >हवामान > वैनगंगा नदीने ओलांडली धोकापातळी; गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

वैनगंगा नदीने ओलांडली धोकापातळी; गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

Wainganga river crosses danger level; Large water release from Gosikhurd dam begins | वैनगंगा नदीने ओलांडली धोकापातळी; गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

वैनगंगा नदीने ओलांडली धोकापातळी; गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

Gosekhurd Water Project : भंडारा येथील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले असून ५.२९ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. (Vidarbha Flood)

Gosekhurd Water Project : भंडारा येथील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले असून ५.२९ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. (Vidarbha Flood)

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा येथील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे बुधवारी उघडण्यात आले असून ५.२९ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गोसीखुर्द धरणाची क्षमता ७४० दशलक्ष घनमीटर (एमसीएम) पाणी साठवण्याची आहे आणि मुसळधार पावसामुळे १,००० दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या जलसंपदा विभागातील (डब्ल्यूआरडी) सूत्रांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहामुळे धरणाच्या रचनेला कोणताही पूर किंवा नुकसान टाळण्यासाठी धरणातील पातळी एकूण क्षमतेच्या २५% वर राखण्यात आली होती. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच नदीतील तोतलाडोह धरणाचे एकही दरवाजे उघडण्यात आले नाहीत. महाराष्ट्रातील तोतलाडोहप्रमाणे, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात चौरई धरण नदीच्या वरच्या प्रवाहावर आहे.

विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडला तर चौरईच्या पाणलोट क्षेत्रात फक्त २२ मिमी पाऊस पडला. यामुळे तोतलाडोहमधील पाण्याची पातळी ५४% वर राहिली. जर मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडला असता, तर चौरई धरणाचे दरवाजे देखील उघडले असते ज्यामुळे नागपूरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असती असे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान भंडारा शहरालगत पुर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून सर्व गेट बंद ठेवून पंप कार्यान्वित करण्यात आले त्यामूळे पुरपरिस्थिती निर्माण झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी वडसा येथे धोकापातळीचे एक फुट वर वाहत आहे. नदीकाठच्या गावांना पुरपरिस्थितीबाबत सूचना देण्यात आल्या आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे दोन गेट उघडण्यात आले त्यातून ९ हजार क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच गडचिरोली  व नागपूर येथे दोन हेलीकॉप्टर, भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती विभागील आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : जुलैच्या सुरुवातीलाच भरली राज्यातील 'ही' धरणे; मराठवाडा-विदर्भ मात्र अध्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

Web Title: Wainganga river crosses danger level; Large water release from Gosikhurd dam begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.