काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातीलतापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भातअकोला सर्वाधिक गरम शहर ठरले.
त्या पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांतही पारा चांगलाच वाढला होता. थंड हवेचे ठिकाण बुलढाण्याचे तापमानही ४० अंशाच्या पार गेले आहे.
दरम्यान हवामान खात्याने पुढील ८ ते १० दिवस वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून उन्हाच्या झळा बसणार आहेत.
विदर्भातील तापमान
| शहर | तापमान | शहर | तापमान |
| अकोला | ४३.१ | अमरावती | ४२.४ |
| वर्धा | ४२.० | वाशिम | ४१.६ |
| नागपूर | ४१.४ | चंद्रपूर | ४१.० |
| गडचिरोली | ४१.० | बुलढाणा | ४०.६ |
| गोंदिया | ४०.५ | यवतमाळ | ४०.२ |
| भंडारा | ४०.० | ब्रम्हपुरी | ३९.६ |
अशी घ्या काळजी
तहान नसली तरी भरपूर पाणी, सरबत प्यावे, हवा खेळती राहण्यासाठी पख्यांचा वापर करावा. सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावेत. शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.
सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा, चष्मा वापरणे, उन्हातून आल्यानंतर चेहऱ्यावर ओला कपडा ठेवावा. दुपारी १२:०० ते ४:०० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
