जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने कापणीवर आलेला गहू, हरभरा आणि मक्याला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. तोंडापूर, सारोळा काही प्रमाणात गारा पडल्या.
भुसावळसह तालुक्यातील शिंदीसह मोंढाळा, मानमोडी व विचवा परिसरात सायंकाळी पावणे सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान सुमारे सव्वा तास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली.
बोदवड येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आठवडी बाजारात विक्रेत्यांनी लावलेले पाल वाऱ्यामुळे उडून गेले. कजगाव, खेडगाव (ता. भडगाव), नगरदेवळा, लोहारा, बाळद, वरखेडी (ता. पाचोरा), पातोंडा व लोंढे (ता. चाळीसगाव) आणि शेंदुर्णी, तोंडापूर (ता. जामनेर) पारोळा येथेही सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर
