सोलापूर : बुधवारी सायंकाळी उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. धरणातीलपाणी पातळी लक्षात घेता पाण्याचा प्रवाह २५ मेपर्यंत उजनी डाव्या कालव्यातून सुरू राहील.
सध्या धरणाची पाणीपातळी वजा २३ टक्क्यांच्या खाली गेली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस खाली जात आहे.
त्यात सध्या उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी सातत्याने घटत आहे. अशा स्थितीत या कालव्यातून २५ मेपर्यंत पाणी सोडले जाणार आहे.
अशी माहिती भीमा विकास विभाग क्रमांक २ सोलापूर येथील उपकार्यकारी अभियंता एस. एच. अलझेनडे यांनी दिली आहे.
अधिक वाचा: उजनी धरणातून आता शेतीला मिळणार जून-जुलैपर्यंत पाणी; घेतला हा मोठा निर्णय