Join us

Ujani Dam Water : उजनीतून भीमा नदी, दोन कालव्यांत शेतीसाठी लवकरच पाणी सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:11 IST

Uajni Dam उजनी धरणातून शहराचा पाणीपुरवठा आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी घेतला.

सोलापूर : उजनी धरणातून शहराचा पाणीपुरवठा आणि शेतीसाठीपाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी घेतला.

दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे. या बंधाऱ्यात ६ जानेवारीपर्यंत पुरेल इतके पाणी आहे.

त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे, अशी मागणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे जानेवारी महिन्यात शेतीसाठी पाण्याची गरज भासते.

त्यामुळे धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून माढा, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून सुरू होती. विधानसभा निवडणुकीमुळे उजनी कालवा सल्लागार समितीचा निर्णय लांबला होता.

राज्याचे नवे जलसंपदामंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पदभार घेतला. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा: महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीशेतीसोलापूरराधाकृष्ण विखे पाटील