Join us

Ujani Dam: उजनी-दौंड विसर्गात घट; धरणात किती पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 15:33 IST

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या २४ तासात २ हजार ५०० क्यूसेक घट झाली आहे.

टेंभुर्णी : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या २४ तासात २ हजार ५०० क्यूसेक घट झाली आहे.

मंगळवारी सकाळी ७ हजार ८४४ क्यूसेक सुरू होता. तर सायंकाळी ६ हजार ७८० झाला होता. बुधवारी सकाळी ६ हजार २५० क्यूसेक होता. तर सायंकाळी ५ हजार ६९२ क्यूसेक विसर्ग सुरू होता. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा ३६.०४ टक्के झाली होती.

उजनी धरणात एकूण ४४.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आत्तापर्यंत उजनी पाणलोट क्षेत्रात एकूण २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात जून ते आ क्टोंबरपर्यंत पाऊस धरला जातो.

सरासरी ५५० मिलीमीटर पाऊस उजनी पाणलोट क्षेत्रात पडत असतो. यावर्षी एका महिन्यात निम्मा पाऊस झाला आहे. गतवर्षी वर्षभरात ४८१ मिली पाऊस झाला होता. गतवर्षी १० जुलै रोजी वजा ३५.९९ टक्के उजनी धरणाची पाणी पातळी होती.

टॅग्स :उजनी धरणपाणीसोलापूरदौंडपाऊसधरण