Join us

Uajni Dam Water Level : उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज किती टक्क्यांनी होतेय वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:52 IST

Uajni Fam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता ३४.३० टक्क्यांवर पोहोचली.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी संथ गतीने वाढत असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता ३४.३० टक्क्यांवर पोहोचली.

दौंड येथील विसर्ग कायम आहे. सध्या ५ हजार ८८३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. दररोज १ टक्क्याने पाणी पातळी वाढत आहे. रविवारी सकाळी ३३.६५ टक्के पाणी पातळी होती.

उजनी धरणात सध्या एकूण ८२.३ टीएमसी पाणीसाठा झाला असून, उपयुक्त साठा हा १८.३७ टीएमसी झाला आहे. गेल्या १८ मे पासून उजनी धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे.

पाणी पातळी वाढण्यास सुरुवात◼️ १ जूनपासून ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी ४ मिलिमीट पाऊस उजनी परिसरात झाला.◼️ गतवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने ४ जूनपासून पाणी पातळी स्थिर राहिली होती.◼️ गतवर्षी ९ जून २४ पासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती.◼️ गतवर्षी ५९.९९ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता, तर ३२.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

अधिक वाचा: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरपाऊस