मुंबई : विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये २० मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे.
तसेच मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची आणि क्षेत्र वाढण्याची तीव्र शक्यता आहे.
या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल.
मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानातही बदल झाले आहेत. समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे सकाळी स्थिर होत आहेत. त्यामुळे मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमाल तापमानात बऱ्यापैकी फरक पडल्याने मुंबईकरांची उष्णतेच्या लाटेपासून सुटका झाली आहे.
अधिक वाचा: राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?
Web Summary : Maharashtra anticipates increased stormy rain and hailstorms until March 20th, impacting Vidarbha, Marathwada, Khandesh, and central regions. Mumbai experiences stable morning winds, moderating temperatures and providing relief from the heat wave. Weather is expected to stabilize from March 21st.
Web Summary : महाराष्ट्र में 20 मार्च तक तूफानी बारिश और ओलावृष्टि की आशंका है, विदर्भ, मराठवाड़ा, खानदेश और मध्य क्षेत्रों में प्रभाव पड़ेगा। मुंबई में स्थिर हवाओं से तापमान में गिरावट आई है और गर्मी से राहत मिली है। 21 मार्च से मौसम स्थिर होने की उम्मीद है।