Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'या' चक्रीवादळामुळे हवेतील ओलावा वाढणार; पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'या' चक्रीवादळामुळे हवेतील ओलावा वाढणार; पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

'This' cyclone formed in the Arabian Sea will increase moisture in the air; Warning of heavy rain again | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'या' चक्रीवादळामुळे हवेतील ओलावा वाढणार; पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'या' चक्रीवादळामुळे हवेतील ओलावा वाढणार; पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत, तर सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

हे वादळ रविवारी ओमानकडे सरकणार आहे, पण सोमवारी मात्र हे चक्रीवादळ वळण घेईल आणि त्याचा प्रवास उलट म्हणजे गुजरातच्या दिशेने सुरू होईल. दरम्यान या वादळाला 'शक्ती' हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे.

६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम पाऊस

• गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात 'तौकते' (२०२१) आणि 'बिपरजॉय' (२०२३) यांसारखी वादळे आली होती; परंतु बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची संख्या कमी आहे.

• या वादळाला 'शक्ती' हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे. उष्ण कटिबंधात चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रालगतच्या १३ देशांनी सुचवलेली नावे अशा वादळांना दिली जातात.

• रविवारी उत्तर भारतात हिमालयाकडे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार होईल. या बदलामुळे हवेतला ओलावा वाढण्याची शक्यता आहे.

• परिणामी, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

Web Title : अरब सागर में 'शक्ति' चक्रवात से महाराष्ट्र तट पर भारी बारिश की चेतावनी।

Web Summary : अरब सागर में 'शक्ति' चक्रवात के कारण महाराष्ट्र के तट पर 7 अक्टूबर तक भारी बारिश की चेतावनी जारी की गई है। मछुआरों को समुद्र में मछली पकड़ने से मना किया गया है। चक्रवात ओमान की ओर बढ़ेगा, फिर गुजरात की ओर। बढ़ी हुई नमी से कोंकण में मध्यम बारिश हो सकती है।

Web Title : Cyclone 'Shakti' triggers heavy rain alert in coastal Maharashtra.

Web Summary : Cyclone 'Shakti' in the Arabian Sea prompts heavy rain alerts for Maharashtra's coast until October 7th. Fishermen are advised against sea fishing. The cyclone will move towards Oman, then Gujarat. Increased humidity may bring moderate rain to Konkan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.