Join us

टेंभू योजनेचे पाणी आटपाडीच्या ओढ्यात खळाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 11:07 IST

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळावे यासाठी झटणाऱ्या दिवंगत क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह नेतेमंडळींनी दुष्काळ मुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत.

आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्याला प्रथम पाणी मिळू शकते व त्यासाठी सरकारला झुकविण्याची गरज असल्याचे दिवंगत डॉ. नागनाथअण्णा यांनी १९९३ साली उभारलेल्या पाणी संघर्ष चळवळीतून दाखवून दिले होते.

खरेतर त्याच वेळेपासून आटपाडी तालुक्याला पाणी मिळण्याची खरी आशा निर्माण झाली होती. पण, तद्नंतर टेंभू योजना निर्माण होणे त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ निर्माण करणे यासाठी राजकीय पटलावर दुष्काळी भागातील मतदारसंघातून निवडून गेलेल्या अनेक आमदारांनी सरकारकडून निधी खेचून आणला. जनतेचा रेटा, पाणी संघर्ष चळवळीचे सातत्य व नेतेमंडळींच्या संयुक्त प्रयत्नातून आज कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे.

पाणी सोडल्याने समाधानआटपाडी तालुक्यात विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध व्हावा व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी टेंभूचे पाणी सोडले आहे. या पाण्याने आटपाडी तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून शनिवारी पाणी शुक ओढ्यातून प्रवाहित झाले. ऐन दुष्काळात गरज असताना पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.

अधिक वाचा: टेंभू सिंचन प्रकल्पातून माण नदीत सोडले पाणी

टॅग्स :टेंभू धरणनदीशेतकरीपाणीशेतीसांगलीदुष्काळ