राज्यात आज (दि.१९) रविवार पासून दिवाळीचे पुढील चार ते पाच दिवस संमिश्र वातावरण राहील. तर सरासरी तापमान अपेक्षित आहे. पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान यलो अलर्ट आहेत. मात्र हा पाऊस सर्वत्र नाही. त्यामुळे बाकी ठिकाणी सरासरी तापमान राहील, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्र कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
तसेच मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील. रात्रीचे तापमान ऊबदार असेल, तर दिवसाचे तापमान तुलनेत कमी असेल, असेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबर हिट मुंबईत आढळून येते. सप्टेंबरमध्ये ढगाळ वातावरण असते. जेव्हा आकाश मोकळे होते, अशावेळी आर्द्रता कमीअधिक होते.
मुंबईत सकाळी आल्हाददायी वातावरण असते. यावेळी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस असणे ही मुंबईच्या मानने चांगली गोष्ट आहे. आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जात आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्र किनारी भागांवर लक्ष ठेवावे लागेल, असे होसाळीकर म्हणाले.