lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > राज्यात उन्हाचा चटका वाढणार, पुढील चार दिवस विदर्भ ढगाळणार हलक्या पावसाची शक्यता

राज्यात उन्हाचा चटका वाढणार, पुढील चार दिवस विदर्भ ढगाळणार हलक्या पावसाची शक्यता

The hot weather will increase in the state, Vidarbha will be cloudy for four days, there is a possibility of light rain | राज्यात उन्हाचा चटका वाढणार, पुढील चार दिवस विदर्भ ढगाळणार हलक्या पावसाची शक्यता

राज्यात उन्हाचा चटका वाढणार, पुढील चार दिवस विदर्भ ढगाळणार हलक्या पावसाची शक्यता

निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल.

निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल.

शेअर :

Join us
Join usNext

पश्चिमी वाऱ्याच्या झंझावाताची साखळी खंडित होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, तीव्र, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी आता संपत आहे.

निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ
माणिकराव खुळे यांनी दिली.

आजपासून (दि.१४) चार दिवसांनंतर विदर्भातील केवळ अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली अशा ४ जिल्ह्यांत १६ ते १९ मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहील. अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

तेव्हा उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी घाबरू नये. तेथे वातावरण कोरडेच राहील, असा अंदाज खुळे यांनी दिला आहे.

खंडित होत जाणाऱ्या प. झंझावाताच्या साखळ्या अन् एल निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, ह्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता नाही, असे खुळे म्हणाले.

राज्यातील कमाल व किमान तापमान

पुणे३६.१ १४.९
नाशिक३३.३ १५.६
सोलापूर३९.४ २१.६
मुंबई२९.८ २२.०
छत्रपती संभाजीनगर ३५.६ १८.५
यवतमाळ३९.५ १९.०

Web Title: The hot weather will increase in the state, Vidarbha will be cloudy for four days, there is a possibility of light rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.