उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या चार-पाच दिवसांत विदर्भात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहून ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या पुढे सरकल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. परिणामी, थंड हवेचे प्रवाह विदर्भ आणि मध्य भारताच्या दिशेने वाहू लागले आहेत. या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होत असून, आकाश निरभ्र राहिल्याने थंडीचा प्रभाव आणखी तीव्र जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्यरात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत थंडीचा जोर अधिक राहणार असून, लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. बाहेर पडताना उबदार कपडे, स्वेटर, मफलर आदींचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
| शहर | कमाल तापमान | किमान तापमान | शहर | किमान तापमान | कमाल तापमान |
| मुंबई (कुलाबा) | ३२.९ | २२.४ | छत्रपती संभाजीनागर | ३१.२ | १२.८ |
| मुंबई (सांताक्रुझ) | ३४.५ | १९.६ | परभणी | ३१.५ | १३.६ |
| रत्नागिरी | ३३.७ | २०.६ | बीड | २९.८ | ११.८ |
| पणजी (गोवा) | ३२.६ | २२.५ | अकोला | ३२.० | १२.५ |
| डहाणू | ३१.९ | १७.६ | अमरावती | ३२.० | १२.५ |
| पुणे | ३१.९ | १४.३ | बुलढाणा | २९.३ | १३.८ |
| अहिल्यानगर | २८.९ | १२.५ | चंद्रपूर | ३१.८ | १६.८ |
| जळगाव | ३१.० | १०.५ | गोंदिया | २९.२ | ११.५ |
| कोल्हापूर | ३०.१ | १८.७ | नागपूर | ३०.४ | १४.५ |
| महाबळेश्वर | २६.१ | १२.८ | वाशिम | ३०.२ | १२.६ |
| नाशिक | ३१.२ | १२.५ | यवतमाळ | ३१.० | |
| सोलापूर | ३२.६ | १५.६ |
गत २४ तासांत, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भातील काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले.
वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या पुढे सरकल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. परिणाम विदर्भात येत्या चार ते पाच दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वृद्ध, बालकांसह नागरिकांनी काळजी घ्यावी, बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा. - डॉ. प्रवीण कुमार, हवामान शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग.
हेही वाचा : हवामान बदलताना आपण आजारी का पडतो? जाणून घ्या कारणे आणि त्यावरील उपयांची सविस्तर माहिती
