Lokmat Agro >हवामान > तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता; आठवडाभर ढगाळ वातावरण

तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता; आठवडाभर ढगाळ वातावरण

Temperatures likely to drop by another one or two degrees; cloudy weather throughout the week | तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता; आठवडाभर ढगाळ वातावरण

तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता; आठवडाभर ढगाळ वातावरण

Weather Update : वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे या आठवड्यात आज रविवार, दि. ४ ते १० मे पर्यंतच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे.

Weather Update : वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे या आठवड्यात आज रविवार, दि. ४ ते १० मे पर्यंतच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे या आठवड्यात आज रविवार, दि. ४ ते १० मे पर्यंतच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे.

सध्या दिवसाचे कमाल तापमान ३८ डिग्रीदरम्यान आहे. आजपासूनच्या आठवड्यात हे तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे. उन्हाचा ताप त्यामुळे अधिक सुसह्य होणार आहे. सध्या तरी रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.

अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल होणार आहे.

४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.

त्यामुळे किरकोळ ठिकाणी एखाद्या-दुसऱ्या दिवशी विजा, वारा आणि गडगडाटीचे वातावरण राहणार आहे. अगदीच किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये, केवळ सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

सध्या सूर्यफूल व उन्हाळी भुईमूग पिके परिपक्व अवस्थेत आली आहेत. या कालावधीत जर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला तर सूर्यफुलाला त्याचा फटका अधिक बसणार आहे. आगामी तीन-चार दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहिला तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी काहीसा चिंतेत आहे.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

Web Title: Temperatures likely to drop by another one or two degrees; cloudy weather throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.