मुंबई : विदर्भाचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर स्थिर असून, मंगळवारी अकोला आणि अमरावतीत ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
तर मुंबईचा पारा ३३ अंश सेल्सिअसवर स्थिर असून वाढती आर्द्रता मुंबईकरांना घामाघूम करत आहे.
गुरुवारपासून कमाल तापमान घसरण्याची शक्यता असली तरी ते ४० अंश सेल्सिअसखाली येणार नाही, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
हवेतील बाष्प वाढल्याचा परिणाम म्हणून गुरुवारपासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमान घटण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बुधवारचे तापमान ४२ अं.से.च्या आसपास असेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. काही ठिकाणी तापमान ४५ अं.से. असेल, तर इतर ठिकाणी ते ४३ अं.से. नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान ४३ ते ४० अं.से. असेल. मुंबईकरांना दमट हवामानामुळे होणारा त्रास कायम राहिल, तर गुरुवारपासून तापमानात घट संभवते.
कुठे किती तापमान?अकोला - ४५.२अमरावती - ४५.२बुलडाणा - ४२.३चंद्रपूर - ४४.८नागपूर - ४४.४वर्धा - ४५यवतमाळ - ४४अहिल्यानगर - ४१.८छ. संभाजी नगर - ४२.८बीड - ४२.४जळगाव - ४४मालेगाव - ४३.६धाराशिव - ४२.२परभणी - ४३.५सातारा - ४१.३सोलापूर - ४३.६मुंबई - ३३.६
अधिक वाचा: आता दुपारची लाईट जाणे होणार बंद; महावितरणच्या मुख्यालयाकडून आले 'हे' नवे निर्देश
Web Summary : Vidarbha's temperature is steady at 45°C. Akola, Amravati recorded 45.2°C. Mumbai is at 33°C with high humidity. A temperature drop is expected from Thursday but will remain near 40°C. Parts of Maharashtra may experience rainfall.
Web Summary : विदर्भ का तापमान 45 डिग्री सेल्सियस पर स्थिर है। अकोला, अमरावती में 45.2 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। मुंबई में उच्च आर्द्रता के साथ 33 डिग्री सेल्सियस तापमान है। गुरुवार से तापमान में गिरावट की संभावना है, लेकिन यह 40 डिग्री सेल्सियस के करीब रहेगा। महाराष्ट्र के कुछ हिस्सों में बारिश हो सकती है।