Join us

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 17:20 IST

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ.

बंगलुरू शहरात यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५ लाख कर्मचाऱ्यांनकडून ‘घरून काम’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे लोक आपल्या गावी जातील आणि शहरावरील पाणी टंचाईचा ताण कमी होईल, अशी अटकळ आहे.

बंगलुरू शहरातील लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. यंदा १८ टक्के पाऊस कमी पडल्याने शहराला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांची पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्रातील धरणसाठाउशिराने आलेला मॉन्सून आणि ऑगस्ट २३ मध्ये सुमारे २१ दिवसांचा झालेला पावसाचा खंड यामुळे महाराष्ट्र राज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मागच्या वर्षाच्या तुलनेने कमी पाणीसाठा असल्याचे चित्र जलसंधारण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.

मागच्या वर्षी २५ मार्च २३ रोजी राज्यातील धरणांमध्ये  ५७.४७ % पाणीसाठा होता. यंदा २३ मार्च २४ रोजी हाच एकूण पाणीसाठा ४०.१८ टक्कयांवर आला आहे.

कुठल्या विभागात किती पाणीसाठानागपूर : ५०.२%अमरावती: ४६.९४%संभाजीनगर: २३.१९%नाशिक: ४१.८७% पुणे: ४०.४३%%कोकण: ४६.७२%

टॅग्स :पाणी टंचाईपाणीकपातपाणीधरणपाटबंधारे प्रकल्प