Join us

पाऊस नव्याने जोर पकडणार; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:36 IST

गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यात कडकडीत ऊन पडल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाणार असेच वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत गेला.

बुधवारी सकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. दिवसभर पावसाची भुरभुर राहिली असली, तरी अनेक ठिकाणी जोरदार कोसळला.

त्यामुळे वातावरणात काहीसा गारठा निर्माण झाला होता. उद्या, शुक्रवारपर्यंत जिल्ह्यासाठी 'यलो' अलर्ट दिला तरी शनिवार (दि. ६) पासून 'ऑरेंज' अलर्ट आहे. या काळात विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यात कडकडीत ऊन पडल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाणार असेच वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत गेला.

सकाळी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभरात उघडझाप असली तरी दुपारनंतर पूर्वेकडील तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

कोल्हापूर शहरातील काही भागात दमदार पाऊस कोसळला. सायंकाळनंतर सगळीकडेच रिपरिप सुरू झाली. दोन दिवस 'यलो' अलर्ट दिला असून, या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

शनिवारपासून पाऊस नव्याने जोर पकडण्याची शक्यता असून, घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, बधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये गगनबावडा तालुक्यात २६.६, आजरामध्ये ६.१, तर शाहूवाडी तालुक्यात ५.६ मिलीमीटर पाऊस झाला.

धरणक्षेत्रात पाऊस सुरू असला तरी विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ५००, तर दूधगंगेतून ३५० घनफूट विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी १२.४ फुटांवर असून, इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.

अधिक वाचा: उसाच्या पट्ट्यात आले पिक बहरले; पाडेगावचे शेतकरी रमेश यांनी एकरात ११ लाख कमवले

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसपाणीधरणकोल्हापूर