Lokmat Agro >हवामान > विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

Rains return after a break; Six dams in Nashik full, 31 TMC water released for Jayakwadi | विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी; नाशिकचे सहा धरणे फुल्ल तर जायकवाडीसाठी ३१ टीएमसी पाणी रवाना

यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. त्यानंतरही नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ७७टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळीनंतर सुरू झालेला पाऊस जुलै अर्ध्यावर आला तरी सुरूच आहे. मध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावलेल्या पावसाने हंगामातील सर्वाधिक पाऊस भावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नोंदविला गेला आहे. आतापर्यंत भावली क्षेत्रात २१५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

खालोखाल इगतपुरी तालुक्यात भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रांजणगाव धरणक्षेत्रात १२२ मिमी इतक्या म्हणजेच सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करूनही सध्या ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक पाणी उपलब्ध असून, त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यःस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ४७ हजार १७५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ६६.८० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी १३ जुलैला धरणांमध्ये केवळ ९ हजार ७९४ दशलक्ष घनफूट म्हणजेच १३.८७टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड समूहातील भावली, वालदेवी, भाम, तर गिरणा खोऱ्यातील हरणबारी आणि केळझर अशी सहा धरणे काठोकाठ भरली आहेत.

जिल्ह्यातील विविध धरणातून होणारा विसर्ग 

धरण विसर्ग 
दारणा ११०० 
नांदूरमध्यमेश्वर३१५५ 
वालदेवी १७४ 
आळंदी २४३ 
पुणेगाव २५० 
भावली ३८२ 
भाम १३१० 
वाकी ३८७ 

जिल्ह्यातील धरणसाठ्याचा तुलनात्मक तक्ता

धरण पाणीसाठा २०२४ पाणीसाठा २०२५धरण पाणीसाठा २०२४पाणीसाठा २०२५ 
गंगापूर २९.१ ५५.९३ वालदेवी १५.५३ १०० 
काश्यपी ६.९७ ८१.०५ कडवा २७.९६ ७७.१३ 
गौतमी गोदावरी १९.३८ ८३.१४ नांदूरमध्यमेश्वर९४.५५ ९१.०५ 
आळंदी २.३३ १०० वाकी ५.०२ ८८.६४ 
पालखेड १३.९४६९.६८ भाम ३८.४७ १०० 
करंजवण १.८२ ५९.१७ भोजापूर ०० ९८.३४ 
वाघाड ३.०८ ८६.३६ चणकापुर ४.८२ ४४.८७ 
ओझरखेड ०० ६४.५५ हरणबारी ९.६९ १०० 
पुणेगाव ०० ७४.९६ केळझर २.९७ १०० 
तिसगाव ०० ४४.६२ नागासाक्या ०० २९.४७ 
दारणा ३५.०४ ६३.०४ गिरणा ११.७५ ५१.२४ 
भावली ४५.९६ १०० पुनद १५.९८ ४४.७३ 
मुकणे ९.७७ ७९.५७ माणिकपुंज ०० ५४.५६ 

हेही वाचा : अवर्षणाच्या फेऱ्यात मिळाली रेशीम शेतीची भक्कम साथ; कुप्पाच्या शेतकऱ्याने ७० गुंठ्यांत घेतले दहा लाखांचे उत्पन्न

Web Title: Rains return after a break; Six dams in Nashik full, 31 TMC water released for Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.