Lokmat Agro >हवामान > संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर

संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर

Only 33 percent of water is left in 2,997 water projects across the state; 3015 villages, mansions thirsty on tankers | संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर

संपूर्ण राज्यातील २,९९७ जल प्रकल्पांत आता अवघे ३३ टक्केच पाणी शिल्लक; ३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकरवर

Maharashtra Water Storage Update : राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Water Storage Update : राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पवन लताड

राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे.

१९ जिल्ह्यांतील ७५८ गावे व २,२५७गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ५७ शासकीय आणि ८७९ खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच जलसंकट निर्माण झाले असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसल्या.

त्यात तापमान चाळिशीपार गेले आहे. प्रकल्पांतील पाणी पातळीदेखील कमी होत चालली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्य आग ओकत आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी पातळी अधिक कमी होईल, हे स्पष्ट आहे.

कोणत्या प्रकल्पांमध्ये किती पाणीसाठा?

मोठे प्रकल्प१३८३१.९७ टक्के
मध्यम प्रकल्प२६०४०.२९ टक्के
लघु प्रकल्प२,५९९३३.८१ टक्के

विभागनिहाय जलसाठा

विभागप्रकल्पजलसाठा
नागपूर३८३३५.७०%
अमरावती२६४४३.६१%
छ. संभाजीनगर९२०३२.७७%
नाशिक५३७३७.५२%
पुणे७२०२६.८६%
कोकण१७३४१.२२%

कुठे किती टँकर ?

राज्यातील १९ जिल्ह्यात २३६ टँकर्सने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात ठाणे ४७, रायगड ३०, पालघर २८, नाशिक ९०, अहिल्यानगर ८, पुणे ६९, सातारा ६६, सांगली १८, सोलापूर १९, छत्रपती संभाजीनगर २४५, जालना १०१, परभणी १, धाराशिव २, अमरावती २०, वाशिम ४, बुलढाणा ३८, यवतमाळ १५, तर नागपूर जिल्ह्यात १५ टैंकर्स लावण्यात आले आहे.

हेही वाचा : अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का तर शेती क्षेत्र घटले; 'हेक्टर'हून 'एकर'मध्ये आला शेतकरी!

Web Title: Only 33 percent of water is left in 2,997 water projects across the state; 3015 villages, mansions thirsty on tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.