Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > अमरावती प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठाच शिल्लक; प्रकाशा-बुराई योजनेला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमरावती प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठाच शिल्लक; प्रकाशा-बुराई योजनेला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Only 32 percent water storage left in Amravati project; Farmers demand to speed up Prakash-Burai scheme | अमरावती प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठाच शिल्लक; प्रकाशा-बुराई योजनेला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमरावती प्रकल्पात केवळ ३२ टक्के जलसाठाच शिल्लक; प्रकाशा-बुराई योजनेला गती देण्याची शेतकऱ्यांची मागणी

धुळे जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा पारा विक्रमी स्तरावर पोहोचल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचा जलसाठा आता केवळ ३२ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

धुळे जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा पारा विक्रमी स्तरावर पोहोचल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचा जलसाठा आता केवळ ३२ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

धुळे जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा पारा विक्रमी स्तरावर पोहोचल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाचा जलसाठा आता केवळ ३२ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खालावत असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून, ही समस्या सोडवण्यासाठी 'प्रकाशा-बुराई' योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

मात्र, हे काम सध्या 'कासवगतीने' सुरू असल्याची भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. अमरावती प्रकल्पामुळे केवळ या सिंचनच नव्हे, तर विखरण, मेथी, वरझडी भागातील लघुबंधारे भरण्यासही मदत होणार आहे.

प्रकाशा-बुराई योजनेला गती मिळाल्यास मालपूर परिसरात हरितक्रांती होऊन शेतकऱ्यांची भाग्यरेषा उंचावेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

अमरावती मध्यम प्रकल्पात सध्या ३२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अहवालातील तरतुदीनुसार खरीप हंगामासाठी आवर्तन सोडता येणार नाही. सध्या टंचाई निवारणार्थ कोणतीही मागणी किंवा आरक्षण प्राप्त नाही. - पीयूष पाटील, कनिष्ठ अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प, मालपूर.

सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

गेल्या वर्षी शिंदखेडा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. सध्या प्रकल्पात अत्यल्प साठा असल्याने २६०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे कठीण झाले आहे.

प्रशासनाकडून यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाते, त्यामुळे शेतीसाठी आवर्तन मिळणे कठीण झाले आहे. २००६ मध्ये पूर्ण झालेल्या या प्रकल्पाने २०१३ ते २०२० दरम्यान मोठा दुष्काळ सोसला आहे. सलग दोन वर्षे प्रकल्प भरल्याने दिलासा मिळाला होता, मात्र यावर्षी पुन्हा परिस्थिती गंभीर झाली आहे.

प्रकाशा-बुराई योजनाः एकमेव पर्याय

तापी नदीचे वाहून जाणारे पाणी अमरावती प्रकल्पात टाकण्यासाठी प्रकाशा-बुराई योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम सध्या 'कासवगतीने' सुरू असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

तापी काठावरील जॅकवेलचे काम रखडलेले असून ते तातडीने पूर्ण झाल्यास अमरावती प्रकल्पात मुबलक साठा उपलब्ध होईल. यामुळे केवळ सिंचनच नव्हे, तर विखरण, मेथी, वरझडी या भागातील लघुबंधारे भरण्यासही मदत होणार आहे.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

Web Title : अमरावती बांध सूखा; किसानों ने सिंचाई परियोजना में तेजी लाने की मांग की

Web Summary : अमरावती बांध का जलस्तर गर्मी के कारण गंभीर रूप से कम हो गया है। किसानों ने संभावित जल संकट से निपटने और कृषि को बढ़ावा देने के लिए 'प्रकाश-बुराई' सिंचाई परियोजना को पूरा करने का आग्रह किया, लेकिन प्रगति धीमी है, जिससे सिंचाई और पेयजल आपूर्ति खतरे में है।

Web Title : Amravati Dam Dries Up; Farmers Demand Faster Irrigation Project Work

Web Summary : Amravati dam's water level is critically low due to heat. Farmers urge completion of the 'Prakash-Burai' irrigation project to combat potential water scarcity and boost agriculture, but progress remains slow, threatening irrigation and drinking water supply.