lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक थंडी 

उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक थंडी 

North Maharashtra cold, 8.8 degree temperature at Dhule | उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक थंडी 

उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक थंडी 

राज्यभरात गारठा वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडी जाणवू लागली आहे.

राज्यभरात गारठा वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडी जाणवू लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरात गारठा वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. नाशिकसहधुळे नंदुरबार जळगाव आधी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने जिकडे तिकडे पेटलेल्या दिसून येत आहेत. तर तर उत्तर महाराष्ट्रात धुळ्यात अवघ्या 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान नाशिकमध्ये थंडी हळूहळू जाणवू लागली असून कमाल तापमानात घसरण होऊ लागली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव नंदुरबार जिल्ह्यापेक्षा नाशिकमध्ये थंडी कमी असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत सकाळी गार वाऱ्यांनी नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. दिवसा काहीसे ऊन काहीसा गारठा जाणवत आहे. आज काल 14 अंशावर असलेले तापमान आज 15 अंशावर गेले आहे. त्यामुळे अजूनही नाशिककरांना गुलाबी थंडीची आतुरता असल्याचे चित्र आहे. 

धुळ्यात तापमान 8.8 अंशावर

धुळ्यात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला असून रात्री प्रमाण दिवस आहे गारटा जाणवत आहे बुधवारी धुळ्यात 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यानंतर आज 8.8 अंशावर हे तापमान केले इकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे तापमानात घट झाल्याचं बोललं जात आहे आठवडाभर वातावरण असेच असेल किमान तापमान दहा अंशाखाली राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली.

जळगावंच आजच तापमान 

तर जळगाव मध्ये तापमानात फारशी घट झाली नसली तरी गार वाऱ्यांमुळे थंडी चांगलीच झोपत असल्याचे चित्र आहे. बुधवारी जळगावमध्ये पारा 11 अंशांवर येऊन ठेपला होता, तर आज गुरुवारी देखील 11 चं अंशावर हे तापमान पाहायला मिळाले. सध्या जिल्ह्यात कोरडे वातावरण राहणार असून सकाळच्या वेळेस धुके त्यानंतर मात्र कोरडे वातावरण हे काही प्रमाणात धोक्याचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

नंदुरबार जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला असून रात्री तर गारठा जाणवतच आहे. मात्र दिवसादेखील थंडीचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीचा तडाखा फार काही वाढला नव्हता. मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर पाहायला मिळाला त्यानंतर आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारी नंदुरबारमध्ये पारा 11 अंशावर होता. त्यानंतर आज पारा दहा अंशावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नंदुरबार वासियांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

Web Title: North Maharashtra cold, 8.8 degree temperature at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.