राहुरी : मुळा धरणाच्यापाणीसाठ्यात कामालीची घट झाली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात अवघा १० हजार २०३ दशलक्ष घनफूट (३९.२४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
सध्या शेतीसाठी उन्हाळी डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. यासाठी उजवा कालवा ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट, तर डावा ४०० दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणार आहे.
धरणातून आतापर्यंत पिण्यासाठी १ हजार ८७७. १७ शेतीसाठी १३ हजार ४२९ दशलक्ष घनफूट, तर उद्योग धंद्यासाठी ११७. ३६ दशलक्ष घनफूट वापरले आहे.
१ हजार २००.३० दशलक्ष घनफूट एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. धरणात ५ हजार ९०० दसलक्ष घनफूट (२७. ४४ टक्के) पाणी शिल्लक राहणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
मुळा धरणात सध्या ३९.२४ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट साठा मृत आहे. धरणाच्या उजव्या कालव्यावर ७० हजार ६८९, तर डाव्या कालव्यावर २० हजार १२१ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे.
धरणातून उजवा कालवा १२ हजार १३३ दशलक्ष घनफूट, तर डावा १ हजार २९६ दशलक्ष घनफूट, असे मिळून दोन्ही कालव्यांसाठी आतापर्यंत १३ हजार ४२९ दशलक्ष घनफूट इतके पाणी खर्च झाले.
आणखी २ हजार ९०० इतके पाणी नियोजित असल्याचे मुळा धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
धरणात ५५ दशलक्ष घनमीटर इतका गाळ साठला आहे. गाळ काढला गेला तर अंदाजे दीड ते दोन दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा वाढू शकतो. गाळ उपसण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. - सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे
३०-४० टक्के पाण्याची नासाडीगेल्या अनेक वर्षांपासून मुळाच्या डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. अंदाजे ३०-४० टक्के पाण्याची नासाडी होत आहे.
अधिक वाचा: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा खरेदी करताय? आता राज्य शासनाचा हा नवा नियम; वाचा सविस्तर