Join us
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Alert : मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात किती तारखेला प्रवेश येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 09:06 IST

Monsoon Alert पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य व आग्नेय भागात तसेच अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अंदमान बेटांच्या श्रीविजय पुरमसह काही भागांमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिली.

पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

या कालावधीत अंदमान बेटे, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांतही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे निर्माण झालेली स्थिती हे एक कारण त्यामागे असू शकते असे हवामान खात्याने या आधी म्हटले होते.

महाराष्ट्रात कधी एन्ट्री?
◼️ मान्सून २६ मे ते ३१ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज आहे.
◼️ केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण एका आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचतो.
◼️ त्यामुळे ६ जूनच्या आसपास तो कोकणात पोहोचू शकतो. त्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे.
◼️ सध्या महाराष्ट्रात हवामानातील पोषक बदलांमुळे मान्सून वेळेआधीच किंवा वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा: राज्यातील 'या' सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मान्यता; शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार

English
हिंदी सारांश
Web Title : Monsoon Arrives in Andaman, Nicobar: When Will it Hit Maharashtra?

Web Summary : Monsoon has reached Andaman and Nicobar. It's expected in Kerala by May 26-31, and Maharashtra around June 6. While a weaker monsoon is predicted nationally due to El Nino, favorable conditions might bring it to Maharashtra on time.
टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजकेरळमहाराष्ट्रपाऊसहवामान अंदाजकोकण