Join us

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मिश्र प्रकारचे हवामान; विदर्भात गारपिटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:47 IST

मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर असला, तरी कमी-अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे.

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर असला, तरी कमी-अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे.

तर दुसरीकडे, राज्यभरात विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा ४० अंश नोंदविण्यात येत आहे.

चार ते पाच दिवस राज्यात मिश्र प्रकारचे हवामान राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

विदर्भात २७ आणि २८ एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानासह पाऊस पडू शकतो.

राज्यात कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये)मालेगाव ४३.२उदगीर ४१.८सातारा ३९.२जळगाव ४१.५परभणी ४४.४नाशिक ३९नंदुरबार ४३.३पुणे ४०.२बारामती ४०.४सोलापूर ४२.१बीड ४३.६जेऊर ४२अकोला ४५.१अमरावती ४४.६बुलढाणा ४०.६चंद्रपूर ४५.४गडचिरोली ४३.२गोंदिया ४२.६नागपूर ४४वर्धा ४४.१वाशिम ४३.४ यवतमाळ ४४.४

अधिक वाचा: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात १७०९ शेतकरी गट तर ११३९ जैवनिविष्ठा केंद्र निर्माण होणार? वाचा सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजतापमानपाऊसगारपीटविदर्भमुंबईमहाराष्ट्रमराठवाडा