Join us

Maharashtra Weather Updates : वातावरणात बदल; पहाटे धुक्याची चादर पसरली IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:36 IST

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे. आज (७ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates)

Maharashtra Weather News: महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही  जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे.  आज (७ डिसेंबर) रोजी काही  जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत वादळी पाऊस झाला. मराठवाडा,  विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत आज (७ डिसेंबर) रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, उद्या (८ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. राज्यात विदर्भातील बुलढाणा, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

राज्यात आज (७ डिसेंबर २०२४) अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मात्र, उद्यापासून (८ डिसेंबर २०२४) राज्यातील हवामान कोरडे होईल आणि थंडीला सुरुवात होईल. तर, ९ डिसेंबरपासून थंडीची तीव्रता वाढेल.

उद्यापासून येत्या १५ डिसेंबरपर्यंत राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस पडेल, असे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

* पाण्याची उपलब्धता असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी.

* मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसचक्रीवादळकोकणमराठवाडाविदर्भ