Join us

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा येलो अलर्ट; काय आहे अंदाज वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:23 IST

Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी रविवारपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तीव्र चटकाही जाणवत आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Alert )

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी रविवारपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तीव्र चटकाही जाणवत आहे. त्यामुळे राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. (Rain Alert )

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उद्या बुधवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Rain Alert )

तर जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. (Rain Alert )

यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. (Rain Alert )

शेतकऱ्यांना सल्ला

* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर; काय आहे आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रविदर्भनाशिकयवतमाळ