Join us

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे असेल सुर्याचा प्रकोप तर कुठे असेल अवकाळीचा मारा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 09:22 IST

Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असतानाच मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर कोल्हापूरच्या काही भागात अवकाळीच्या सरी बरसल्या. वाचा हवामान अंदाज सविस्तर (unseasonal rains)

Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठवड्यात उष्णतेच्या प्रचंड झळा जाणवल्या आहेत. कमाल तापमानाची पारा चढाच होता. त्यामुळे नागरिकही वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले आहेत. 

एकीकडे उष्णतेची ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रात येत्या ४ दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज IMD ने दिला आहे. (unseasonal rains)

एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असताना राज्यभरात आज प्रचंड उकाडा जाणवत आहे. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. (unseasonal rains)

विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  तर काल राज्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काही भागात उष्णतेच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. (unseasonal rains)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशसह २४ राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम बिहार तसेच पश्चिम बंगालच्या भागात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   (unseasonal rains)

विदर्भावासीयांची होणार का उकाड्यापासून सुटका

विदर्भात आजपासून (२७ एप्रिल) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून इतर जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान

मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीची हजेरी

सोलापूर, सांगली ,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात परत एकदा अवकाळीचे संकट; कसे असेल आज हवामान वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा