मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे.
रविवार ते मंगळवार मुंबई महानगर प्रदेशात तापमान चढे नोंदविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला होता.
कुठे किती पारा?
पुणे : ३६.०
सोलापूर : ३८.२
सांगली : ३७.९
रत्नागिरी : ३७.५
मुंबई : ३७.४
कोल्हापूर : ३७.१
सातारा : ३६.२
धाराशिव : ३६.१
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ होत आहे. ६ ते १२ मार्चदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई व कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. मुंबईचा पाराही ३९ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवार ते मंगळवार दरम्यान उन्हाचा तडाखा जास्त असू शकेल. - अश्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक